मा.पंकजा ताई मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी डावलल्यामुळे मराठवाड्यातील प्रत्येक 'जनसामान्य' नाराज झाला आहे, पंकजा ताईंवर जिवाच्या आकांताने प्रेम करणारी जनता.. वारंवार ताईंना डावललं जात असल्यानं प्रचंड क्रोधित झाली आहे.
याचेच पडसाद वारंवार पहायलाही मिळत आहेत..
आजच बीडचे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथजी आंधळे यांनी आपला राजीनामा घोषित केला.
मागच्या वेळी हेच पाऊल, पंकजा ताईंचे सहकारी सर्जेरावजी तांदळे यांनी उचलले होते-
आणि आज आंधळे यांनी हेच पाऊल स्विकारले.
म्हणजेच ज्यांनी कष्टाने घाम गाळून महाराष्ट्रभर भाजपाला मोठे केले.. तेच भाजपाला आणखी वेगळे दिवस दाखवून देवू शकतात, असेच ताईंच्या समर्थकांचे आणि प्रियजणांचे उद्गार आहेत.
यावेळी 'बीड जिल्हा उपाध्यक्षपद' सोडण्याचे जाहिर करताना आंधळे म्हणतात..
"मा.पंकजा ताई मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी डावलल्यामुळे
मी जगन्नाथ आंधळे
भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे.🙏🏼😔🙏🏼
ताई नाही तर दुसरा कोणीच आमचा नेता 🌷🌷नाही🙏🏼🙏🏼"
.
.
.
.
.
संदर्भ- Social Media.