महाराष्ट्राचे 'राजकारण' म्हणजे एकापाठोपाठ एक धक्के आहे !
मी आपल्याच परिवारातील 'सदस्य' पासून ते, 'मी पुन्हा येईल' अशाप्रकारचे सर्व 'मुख्यमंत्री' पाहिल्यानंतर..
आता या महाराष्ट्राच्या राजकारणात नवीनच ट्विस्ट आलेला आहे.
सगळीकडे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू असताना, स्वतः फडणवीस यांनी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे 'एकनाथ शिंदे' हे होतील, असे स्पष्टपणे जाहिर करून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीनच ट्विस्ट आणले आहे.
त्यामुळे पुढचाही मुख्यमंत्री 'शिवसेनेचा'च असेल हे भाकीत सत्यात उतरताना दिसत आहे.
दरम्यान महाराष्ट्राचा आणि शिवसैनिकांचा राग पाहता फडणवीस यांनी काढता पाय घेऊन, बंडखोर नेते 'शिंदे' यांना ढाल बनविले आहे.. असेही बोलले जात आहे.
अडीच वर्षांचा मुख्यमंत्री होण्यापेक्षा - 2024 च्या निवडणुकांवर डोळा असलेला केव्हाही बरा ! नाहीतर सरकार पाडण्यासाठी केलेली - मागची अडीच वर्षांची मेहनत पाण्यात जाईल, या भीतीने हा निर्णय झालेला आहे..! असेही मत व्यक्त होत आहे.
आता खरे काय आणि खोटे काय माहीत नाही, परंतू सेनेचाच मुख्यमंत्री राहिल्याने शिवसैनिकांच्या 'सद्भावनेचा' नक्कीच 'भाजप'ला फायदा होईल एवढं मात्र नक्की!
.
.
.
.
.
संदर्भ- Social Media!