राष्ट्रगीताने पावन, ती शाळा..
पसायदान, खरा तो एकची धर्म,
गुरूवाणी, आणि सलोख्याची भावना..जिथे निर्माण होते,
ती पुण्यभूमि म्हणजेच 'शाळा'..!
जमिनीच्या वादातून-तेढ निर्माण होऊन निर्णय इतके टोकाला गेले की जमिन मालकाने शाळेत जनावरंच आणून बांधली !
सदरील घटना ही 'कोल्हापूर' जिल्ह्यातील 'आजरा' या गावातील आहे, 'खाजगी शिक्षण संस्था' आणि 'जमिनीच्या मालका'मध्ये वाद आहे आणि या वादामुळेच शाळेचं रूपांतर 'गोठ्यात' झाले आहे!
जमिन मालकाने या वादामुळे जनावरं थेट वर्गातच आणून बांधली आहेत!
यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत, पावसाळा सुरू झाल्याने बाहेर शिकवणे व शिक्षण घेणे कठीण झाले आहे.
या वादात अंतिम निर्णय काय व्हायचा तो होईल.. परंतू यातून विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होतंय येवढं मात्र नक्की !
.
.
.
.
.
(संदर्भ... TV. मिडिया)