शेजारील राष्ट्र श्रीलंका येथील चालू आणि घडत असलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला नव्याने सांगायला नको!
श्रीलंकेतील आर्थिक पेचामुळे दैनंदिन गरजाही भागवता येत नसल्याने अस्वस्थ झालेल्या सामान्यांच्या रोषाने शनिवारी तेथे हिंसक वळण घेतले.
संतापलेल्या लक्षावधी लोकांनी अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसून प्रचंड तोडफोड केली. जुन्या संसद इमारतीसह सायंकाळी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या खासगी निवासस्थानालाही जमावाने आग लावली. यामुळे श्रीलंकेत अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे.
अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांना परिस्थितीचा अंदाज आल्याने त्यांनी शुक्रवारीच पलायन केले. आंदोलकांचा आवेश पाहून, देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा देण्यास तयार आहोत, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे म्हणाले.
सरकारी संपत्तीचे कोणतेही नुकसान न करता; तसेच कोणताही हिंसाचार न करता ची आंदोलकांनी अध्यक्ष निवासाचा ताबा घेतला. गोताबाया राजीनामा देत नाहीत तोवर मागे हटणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
दरम्यान, सुरक्षा कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात दोन पोलिसांसह किमान ३० जण जखमी झाले.
■ पुढील ३० दिवस सर्वपक्षीय सरकार स्थापणार.
■ संसदेचे सभापती हंगामी अध्यक्ष होणार.
■ खासदारांमधूनच अध्यक्षांची निवड करणार.
■ लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार.