'शेतकर्यांचे नेते' म्हणून ओळखले जाणारे नेते 'सदाभाऊ खोत' आता नवीनच वादात अडकले आहेत!
'हॉटेल मामा-भाचे' चे मालक शिनगारे यांचा आरोप आहे की, "खोतांनी 2014 सालापासून आमच्या हॉटेल मध्ये जी उधारी करून ठेवली आहे, ती पहिले नील करावी..आणि मग तुमचे जगातले 'अत्यंत महत्त्वाचे' सर्व दौरे करावेत! "
शिनगारे हे सदाभाऊ खोत यांचेच कार्यकर्ते असल्याचे सांगतात, "सदाभाऊ यांचे कार्य पाहून आम्ही त्यांच्या सोबत उभे राहिलो परंतू आज त्यांचीच आमच्या कडे जवळ-जवळ 'सहासष्ट हजार रुपये' उधारी थकीत आहे."
या सर्व प्रकारात शिनगारे यांच्यावरच 'खोत' यांनी गुन्हा दाखल केला आहे!
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी शिनगारे हे 'राष्ट्रवादी'चे कार्यकर्ते आहेत आणि ते मुद्दामहून आपल्याला बदनाम करत आहेत, असेही 'खोत' म्हणाले.
.
.
.
.
(सदरील बातमी प्रसारमाध्यमांमधून घेण्यात आलेली आहे)
.
.
.
.
(सदरील बातमी प्रसारमाध्यमांमधून घेण्यात आलेली आहे)