टायटल वाचून तुम्हीबी हाच विचार करत असाल ना की बाबा आता काय झालं? किंवा मोदींनी काही वेगळी घोषणा केली का काय!
तर तसं काहीबी न्हाई...
मोदींनी 'शंभर' घोषणा करू देत ओ... पण ह्यांनी आयकायला तर पायजी...
म्हणजे???
म्हणजे वाघाचे पंजे...!
तुम्ही आम्हाला सांगा...
मोदींनी जर एखादी घोषणा केली तर तुम्ही तिला भाव देणार का न्हाई...
देणार ना..पण हितले लोकं त्यांच्या घोषणांनाच काय त्यांच्या आदेशांना पण मोजत न्हाईत !
घाबरू नका..देशविरोधी कोणत्याच घटना इथं होत नाहीत... आणि 'नाही मोदी विरोधी लोक हाईत इकडे...'पण बीडला यायच्या आधी एक गोष्ट ध्यानात ठेवा...☝
"बीडला 10 रुपायचा ठोकळा चालत न्हाई!"
तुम्ही म्हणतान,"ठोकळा तर कोणताच चालत न्हाई, ठोकळा काय सजीव थोडीच आहे चालायला..."
पण मजाक नाही!
बीडमध्ये 10 रुपयांचा ठोकळा/नाणं कोणताच व्यापारी तुमच्याकडून घेणार नाही!
आयला ही काय आता नवीन !
नवीन न्हाई...जवा पासनं नोटबंदी झालीया का न्हाई..
तवा पासनं बीडचे व्यापारी,रिक्षावालेसुद्धा... रिक्षावालेच काय तर बॅंकासुद्धा 10 चा ठोकळा घेत न्हाईत!
आधी तर 'दोन हजारा'च्या नोटासुद्धा आम्ही घेत नव्हतो पण जाऊद्या म्हणलं...
10 चा ठोकळा गल्ल्यात टाका.. हिकडं लाड न्हाई !
आता पुढं काय करायचं तुमचं तुम्हीच ठरवा!
आम्ही आमचं बघून घेऊ.
अस्सल बीडकर कडून हा स्पेशल लेख बिडकरांसाठी!
बीड विषयी हा अनोखा Fact ऐकून कसे वाटले आमच्या Comment Box कळवा...
आणि अशाच आणखी गम्मतशीर Facts साठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका!
- खरंय भावा !!!
**संदर्भ-अनुभवांवरून ...