ईडी प्रकरणं आणि निरनिराळ्या घोटाळ्यांचे आरोप होत असतानाच..आता नवीन बातमी समोर येत आहे.
'राहुल गांधी' यांची ईडी चौकशी सुरू केल्या-कारणाने..महाराष्ट्र आणि देशभरात याचा निषेध केला जात आहे.
'महाराष्ट्र कॉंग्रेस'ने राजभवनावर काढलेल्या मोर्चात अनेक कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते, तसेच अशोक चव्हाण, भाई जगताप, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे!
केंद्र सरकार आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून घेत असल्याचे आरोप करणा-या या मोर्चाचे नेतृत्व, नाना पटोले हे करत आहेत.