असंख्य घडामोडीनंतर काल 'मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे' यांनी महाराष्ट्र तसेच 'आपल्या' पक्षातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
बोलताना ते 'भावनिक' सुद्धा झाले आणि शेवटी 'आपल्याच' लोकांच्या बंडामूळे इतके खचले की, त्यांनी स्वतःची 'वर्षा' वरील 'माना'ची जागा सोडून.. आपल्या 'मातोश्रीला'च जवळ केले!
हा क्षण इतका भावनिक होता की, आपल्या 'राजाला' हताश होऊन घरी परतताना पाहून..संपूर्ण महाराष्ट्राला व शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले!
आणि..
'कुर्हाडीचा दांडा गोतास काळ' ही म्हण स्वतःच म्हणून दाखवून मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानी परतले!
या म्हणीचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितला खरा..परंतू याचा आपणा-सर्वांनाच प्रत्ययही येणं हेही दुर्दैवच!
शेवटी फक्त आम्ही एवढचं सांगू.. की,
"उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांसारखेच मनमिळाऊ आहात, तुम्हाला आपल्याच लोकांचे 'राजकारण' कळो अथवा ना कळो!
"उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांसारखेच मनमिळाऊ आहात, तुम्हाला आपल्याच लोकांचे 'राजकारण' कळो अथवा ना कळो!
परंतू तुम्ही तुमच्या कालावधीत संपूर्ण 'महाराष्ट्र'वासीयांची एका परिवारातील सदस्याप्रमाणे काळजी घेतलीत,
तुम्ही पवार साहेबांनी दाखवलेल्या विश्वासात कधीच कमी जास्त न करता, मदत करताना जात-धर्म पाहिला नाहीत- यामुळेच अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राचे तुम्ही 'आपले मुख्यमंत्री' झालात.
आता पुढे होईल ते होईल... तुम्ही मुख्यमंत्री नाही राहिलात तरी चालेल, परंतू अशीच महाराष्ट्राची काळजी असू द्यात...
आम्हाला कायम एक आधार वाटला पाहिजे की बस्स..या सर्वांमध्ये 'आपला आणि हक्काचा' कोणीतरी मौल्यवान व्यक्ति आहे, जो मुख्यमंत्री पदाच्याही वर जावून.. अगदी राजासारखं काम करतो...आपले शिवसेना प्रमुख !"