बीड- गुरुवारी रात्री उशिराने सुरु झालेला पाऊस, शुक्रवारी मध्यरात्री उशिरा पर्यंत सुरू होता.
तोच गुरुवार पूर्ण होऊन शुक्रवार सुरू झाला आणि मध्यरात्री 12:19 मिनिटांच्या सुमारास सर्व नगर नाका परिसर दूरपर्यंत प्रकाशित झाला आणि त्यानंतर लगेचच मोठ्ठा आवाज झाला..!
हा आवाज इतका मोठा होता की नगर नाका परिसरापासून - तीन ते चार किलोमीटर वर्तुळाकार परिसरात याचा हादरा पोहोचला! नगर नाका परिसरात वीज नक्की कुठे कोसळली हे सांगणे कठीण आहे, परंतू प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून हा आवाज आणि प्रकाश इतका मोठा होता की खात्रीशीर ही वीज कोसळली आहे.
पाऊस एवढा जोरदार आहे की, आतापर्यंत कुठल्याही जिवितहानी विषयीची माहिती मिळालेली नाही.
तरी सर्व नागरिकांनी सतर्क रहावे.
.
.
.
.
.
टिम- खरंय भावा!!
#beed #बीड #paus #वीज #kharaybhava