सध्या सर्वत्र पावसाने आपली दमदार हजेरी लावलेली आहे.
ठिकठिकाणी 'खड्ड्यां'मुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत तर कुठे निरनिराळे 'चमत्कार' घडून येत आहेत.
अशाच एका चमत्काराचा व्हिडिओ सगळीकडेच 'व्हायरल' होत आहे,
भगवान विष्णूंची 'शेषनागा'वर विराजमान झालेली मूर्ती एका पुरात 'शांत चित्ताने' उभी असलेली या व्हिडिओ मध्ये दिसते.
पहा भगवान विष्णु यांच्या मूर्तीचा व्हायरल व्हिडिओ! 👈👈
भगवान विष्णु हे शांत आणि स्मित मुद्रेने सर्व जगाला आपलेसे करतात आणि आपल्या भक्तांनाही याची अनुभूती देतात,असे मानले जाते.
असाच एक अनुभव लोकांना पहावयास मिळत आहे.
प्रत्यक्षात चक्क भगवान विष्णु यांची 'पाण्यावर तरंगणारी मूर्ती', सर्वांनाच या व्हिडिओ च्या माध्यमातून पहायला मिळत आहे.
दरम्यान व्हायरल व्हिडिओ मध्ये, सत्य - असत्य काय? आणि हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती आम्ही देतो..
राज्यात अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि या व्हिडिओ चा संबंधही राज्याशी जोडला जातोय.
हा व्हिडीओ सत्य असून पाण्यावर, शेषनागावर तरंगणारी ही मुर्ती विष्णु व लक्ष्मीची आहे.
हा व्हिडीओ महाराष्ट्रातील नसून, आसाम येथील गुवाहाटी इथला आहे.
ब्रह्मपुत्रा नदीच्या किना-यावर चक्रेश्वर मंदिर परिसरात मूर्ती ही मूर्ती आहे, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामूळे मूर्ती खाली असणारा मोठा खांब/पिलर हा दिसून येत नाही.
ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली की हे अनोखं आणि दैदीप्यमान दृश्य पहायला मिळतं.
त्यामुळे हा व्हिडीओ जरी खरा असला तरी ही मूर्ती मानवनिर्मित आहे, ही मूर्ती नदीवर 'प्रकट' झालेली नाही.
.
.
.
.
.
- टिम खरंय भावा !
संदर्भ- प्रसारमाध्यमे.
- टिम खरंय भावा !
संदर्भ- प्रसारमाध्यमे.