सर्वसामान्यांपासून मोठ-मोठ्या घराण्यांचे प्रेम आणि आराध्य असलेले 'बालाजी देवस्थान' हे दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.
पूर्वीपासून ते आतापर्यंत बालाजीला जाणारी मंडळी ही वारंवार बालाजीला जातात आणि आपल्या मनोकामना, आपले दुःख हे बालाजी समोर मांडतात...
तसं पहायला गेलं तर.. काही 'नास्तिक लोक' म्हणतात की बालाजी हा देव खूपच 'श्रीमंत' समजला जातो, तर एवढा पैसा जातो तरी कुठं ?
तर त्याच उत्तर आहे,
इथे येणारा लहानात-लहान ते मोठ्यात मोठा भक्तगण कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही..
त्यांची पुरेपूर सेवा ही 'ट्रस्ट' मार्फत केली जाते!
आता ती कशी ते पाहूया...
तुम्ही जेव्हा 'रेणिगूंटा' किंवा 'तिरुपती रेल्वे स्टेशन'हून 'तिरुमला' कडे निघता...
एक मिनिट - एक मिनिट तुम्ही म्हणाल तिरुपती म्हणजेच 'बालाजी' ना!
तर तसं काsssही नाही,
तिरुपती आणि बालाजी यांच्यात काही 'किलोमीटर'चे अंतर आहे.
बालाजी हे 'तिरुमला' या ठिकाणी पहायला मिळतात.
तिरुमला हे ठिकाण एवढं 'स्वच्छ' ठेवलंय की तुम्ही तिरुमला पोहचण्याच्या 'दहा किलोमीटर' आधीच, या ठिकाणच्या बॉर्डर वर तुमच्याकडून 'प्लास्टिक'च्या पाणी बॉटल ह्या जमा करून घेतल्या जातात!
सर्वात जास्त कचरा हा प्लास्टिक च्या बॉटल्सचाच होतो, आणि तो आपल्या 'या ठिकाणा'ला प्रदूषित करू नये यासाठीची पुरेपूर काळजी ही ट्रस्ट कडून घेतली जाते.
पिण्याच्या पाण्याच्या 'विनामूल्य सुविधा' ह्या 'ट्रस्ट' मार्फत जागोजागी केलेल्या दिसतात.
देवस्थान, संपूर्ण मंदिर परिसर, रस्ते, राहण्याच्या जागा सर्व कायमच स्वच्छ रहावे,यासाठी ट्रस्टची माणसं रात्रंदिवस मेहनत करत असतात.
दरवर्षी 'तिरुमला' मध्ये काहीतरी 'नविन बदल' दिसतो असे भाविकांचे म्हणणे आहे.
दरवर्षी 'तिरुमला' मध्ये काहीतरी 'नविन बदल' दिसतो असे भाविकांचे म्हणणे आहे.
*रहायची सोय!
तुम्ही जर कुठल्याही नियोजनाशिवाय 'तिरुमला' येथे जाण्याचा विचार करत असाल तर...सावधान!!!
'तिरुमला' या ठिकाणची प्रत्येक गोष्ट ही पूर्णपणे 'नियोजनबद्ध'च असते,
म्हणूनच येथे ट्रस्ट मार्फत पुरविल्या जाणार्या हजारो खोल्या ह्या अगदी काही तासांतच 'बुक' होतात.
तिरुमला ठिकाणी तुम्हाला कोठेही 'खाजगी लॉज' किंवा 'खोल्या' पहायला सुद्धा मिळणार नाहीत!
तुम्ही जर कुठल्याही नियोजनाशिवाय 'तिरुमला' येथे जाण्याचा विचार करत असाल तर...सावधान!!!
'तिरुमला' या ठिकाणची प्रत्येक गोष्ट ही पूर्णपणे 'नियोजनबद्ध'च असते,
म्हणूनच येथे ट्रस्ट मार्फत पुरविल्या जाणार्या हजारो खोल्या ह्या अगदी काही तासांतच 'बुक' होतात.
तिरुमला ठिकाणी तुम्हाला कोठेही 'खाजगी लॉज' किंवा 'खोल्या' पहायला सुद्धा मिळणार नाहीत!
ट्रस्ट मार्फत पुरविल्या जाणार्या या खोल्या अगदी 'पन्नास रूपये, शंभर रूपये' प्रति दिन या माफक शुल्कात उपलब्ध असतात आणि या 'आपल्या घराप्रमाणे'च स्वच्छ व सुंदर असतात.
या रूम साठी तुम्हाला आधीच बूकिंग करावी लागते, अन्यथा तुम्हाला एका खोलीसाठी चार ते पाच किंवा त्यापेक्षाही जास्त तासांसाठी रांगेत सुद्धा उभे रहावे लागू शकते!
यासाठी तुम्हाला आपले 'आधार कार्ड' सोबत बाळगण्याची गरज असते.
या 'खोल्यां'शिवाय तुमच्याकडे 'मठा'चा ही पर्याय असतो परंतू त्या मठामधिल खोल्या 'सहजासहजी' कोणालाही मिळत नाहीत ,त्या साठी मोठा पाठपुरावा लागतो आणि याचे दरही 'ट्रस्ट'च्या खोल्यांच्या तुलनेत खूपच जास्त असतात.
अंदाजे दीडशे पासून - दोन हजार रूपये सुद्धा ( प्रति व्यक्ती ).
*जेवणाची सोय -
तिरुमला येथे जेवणही पुरेपूर आणि तिन्ही वेळी तुम्ही 'विनामूल्य' करू शकता!
फरक फक्त एवढाच की तुम्हाला दाक्षिणात्य जेवणाचाच लाभ मिळू शकतो..तोही अगदी 'केळीच्या पानावर'!
या जेवणाची सोय 'चार हॉल' मध्ये केली जाते, या चारही हॉल मध्ये एका वेळी हजारो लोक हे जेवणाचा आनंद घेतात.
अशा अनेक पंगती एकामागून एक या वाढतच असतात.
*मोफत बससेवा -
तुम्हाला आपल्या खोली किंवा मठापासून, CRO चौक, अन्नछत्र, बस स्टँड अशा विविध ठिकाणी फिरण्यासाठी 'मोफत बससेवा' सुद्धा ट्रस्ट मार्फत केली जाते.
अशा अनेक पंगती एकामागून एक या वाढतच असतात.
*मोफत बससेवा -
तुम्हाला आपल्या खोली किंवा मठापासून, CRO चौक, अन्नछत्र, बस स्टँड अशा विविध ठिकाणी फिरण्यासाठी 'मोफत बससेवा' सुद्धा ट्रस्ट मार्फत केली जाते.
*प्रशस्त टॉयलेट -
तुम्हाला प्रत्येक 'शंभर मीटर'वर दुसरे शौचालय पहायला मिळते,
हे रोजच्या रोज स्वच्छ ठेवले जाते.
या शौचालयांमुळे महिलांची आणि पुरुषांचीही कधीच गैरसोय होत नाही.
*मोफत रुग्णालये -
इथे काही रुग्णालये सुद्धा पहायला मिळतात ज्यामधे तुम्ही आयुर्वेदिक उपचारही घेऊ शकता.
तेही विनामूल्य!
*लॉकर -
तुम्हाला रहायला जर जागा मिळाली नाही आणि तुमच्या मौल्यवान वस्तू तुम्हाला कुठेतरी ठेवायच्या असतिल तर आपल्या आधार कार्डाच्या जोरावर तुम्ही मोफत लॉकर सुद्धा मिळवू शकता!
अशा अनेक सुविधा तुम्हाला विनामूल्य मिळतात, ज्यात मुंडन, एक स्वादिष्ट लाडू, पाणी, अन्न इत्यादी.
*घ्यावयाची काळजी -
'तिरुमला' जाण्याचा प्लॅन करत असाल आणि दगदग होऊ द्यायची नसेल तर आपल्या सर्व बूकिंग ह्या दोन - अडीच महिने पूर्वीच करून ठेवा!
तुम्हाला कुठल्याही रांगेत थांबायची गरज लागणार नाही.
पैसे 'कॅश' च्याच स्वरुपात बाळगा येथे 10% लोक सुद्धा ऑनलाईन व्यवहार करत नाहीत, अन्यथा खूपच मोठी गैरसोय होईल.
.
.
.
.
.
- टिम खरंय भावा!
संदर्भ- अनुभव आणि Social Media.
#balaji #tirupati
#तिरुपतीबालाजी