रायगड : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे हे निधन पावल्याची माहिती आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. आज पहाटे 5:30 वाजता 'भाताण बोगद्या' जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.
हा अपघात घातपात असावा असा अंदाज लावण्यात येत होता आणि तेव्हाही भाजप विरोधी भूमिका सर्व 'ताई समर्थकांमध्ये' होती.
आणि आज 'बीड'चेच मराठा नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले..त्यांना यावेळी 'मोठ्ठ' मंत्रिपद मिळणार अशी उत्सुकता त्यांच्या समर्थकांमध्ये होती. परंतू इतकी मोठी घटना घडेल असे कोणाला वाटले सुद्धा नव्हते. त्यामुळे ऐन मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी ही घटना होणे म्हणजे 'घातपात' असावा अशी चर्चा आहे,
परंतू,
मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिल्याची माहिती आहे. अपघातावेळी विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम हे सुद्धा सोबत होते. यामध्ये मेटे यांच्या डोक्याला पाठीमागून गंभीर जखम झाल्याची माहिती आहे. आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी सांगितले.
या भीषण अपघातात विनायक मेटेंसह सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

विनायक मेटे यांच्या बाबतीत अशा झालेल्या घटनेने सबंध महाराष्ट्र दुःखी झाला आहे.
अपघातस्थळी ते एकटे नव्हते,
म्हणून हा घातपात असावा अशी शक्यता जाणवत नाही.
● कोण होते विनायक मेटे ?
•मराठा समाजाचे तडफदार नेतृत्व म्हणून प्रसिद्ध.
•विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
•मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हेमहाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
•मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
•अरबी समुद्रातील 'शिवस्मारक समिती'चे ते अध्यक्ष देखील होते.
•बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार बनले.
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य
#vinayakmete #vinayakmeteaccident
.
.
.
- सदरील बातमी ही प्रसारमाध्यमांच्या आधारे घेतली आहे.
टिम खरंय भावा!